नगर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारताचा तुफानी फलंदाजी करणारा शुभमन गिल (Shubhamn Gill) यांनी शतकी खेळी केली आहे. शुभमनने आपल्या भन्नाट फॉर्मसह आपले चौथे कसोटी शतक झळकावले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ३ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १५५ चेंडूंत १०१ धावा केल्या. तर शुभमन गिलने १४१ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने ५ षटकार आणि १० चौकार लगावले आहेत.
नक्की वाचा : महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची महिलांना मोठी भेट
रोहित शुभमनची दमदार भागीदारी (IND vs ENG 5th Test)
रोहितने शुभमन गिलसोबत २०० अधिक धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या २०० पार नेऊन ठेवली. यासोबतच भारताने इंग्लंडने दिलेले २१८ धावांचे लक्ष्य गाठत ४४ धावांची आघाडीही मिळवली आहे.रोहितने या शतकासह कसोटीमधील १२ वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ४७ वे शतक झळकावले आहे. तर शुभमन गिलने कसोटीमधील चौथे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १० वे शतक केले.
पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजीने वर्चस्व गाजवल्यानंतर भारताची फलंदाजीची सुरूवातही शानदार झाली. यशस्वी आणि रोहितच्या जोडीने विस्फोटक फलंदाजी करत इंग्लिश संघाला बॅकफूटवर ठेवले. जैस्वालने बाद होण्यापूर्वी ५८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला.
पाचव्या कसोटीत इंग्लंड संघाची नाणेफेक (IND vs ENG 5th Test)
पाचव्या कसोटीत इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेन स्टोक्सचा हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. कारण संघाची सुरूवात चांगली झाली. पण सलामीवीर बाद झाल्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाज पुन्हा एकदा फेल ठरले. १३५ वर ४ बाद अशी धावसंख्या असताना कुलदीप आणि अश्विनच्या फिरकीवर २१८ धावा होईपर्यंत इंग्लंडचा संघ ऑल आऊट झाला. कुलदीपने १५ षटकांत ५ विकेट्स घेत आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंड संघाला नाचवले. नंतर आपला १०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या अश्विनने ४ विकेट्स मिळवले. तर जडेजाला १ विकेट मिळवण्यात यश आले.
अवश्य वाचा : महिला दिनी केदार शिंदेंची मोठी घोषणा;’आईपण भारी देवा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला