RPI : नगर : युवा पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या बिंगो जुगारवर नगर जिल्ह्यात पोलिसांनी तातडीने बंदी घालून कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (गवई) अल्पसंख्याक आघाडी (Minority Alliance) तर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख यांनी पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) दिले आहे.
नक्की वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानाला न्याय देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या आश्वासनानंतर उपाेषण मागे
नगर जिल्ह्यात बिंगो जुगार जोमात सुरू आहे. ऑनलाइन बिंगोमुळेच अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. युवा वर्ग जुगार व व्यसनाच्या आहारी जात आहे. बिंगो जुगारवर बंदी असताना देखील त्यावर कारवाई होत नाही. पोलीस प्रशासन कोणाच्या आशीर्वादाने बिंगो चालकांना अभय देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरासह जिल्ह्यात बिंगो जुगारवर कारवाई करुन ते कायमचे बंद व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाने ठाेस भूमिका घ्यावी, अशी मागणी रिपाइं अल्पसंख्याक आघाडीतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा ६ डिसेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं सूचक विधान