RPI : नेवासा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याविषयी अवमानकारक लिखाण करून पत्रके फेकण्याचे निंदनीय कृत्य करणाऱ्यावर व देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्यावर बूट फेकणाऱ्या माथेफिरु वकीलावर कठोर कारवाई करा, या मागण्यांसाठी गुरुवारी (ता.९) ‘आरपीआय‘च्या (RPI) (आठवले गट) वतीने नेवासा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
अवश्य वाचा : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार
निषेध मोर्चा काढत दिले निवेदन
युवा नेते अॅड. संजय सुखधान, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुशिल धायजे, नेवासा शहराध्यक्ष पप्पूभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा बसस्थानक येथून मोर्चास प्रारंभ झाला. गणपती चौक, श्रीरामपूर रोड असा निषेध मोर्चा काढत मोर्चेकरी नेवासे पोलीस ठाणे आवारात ठिय्या मांडत निषेध सभा घेण्यात आली. मोर्चाचे प्रास्ताविक दयानंद खिलारी यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
नक्की वाचा : सावेडी उपनगरात युवकावर कोयत्याने हल्ला; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
भीमसैनिकांची जोरदार घोषणाबाजी (RPI)
मोर्चात वंचितचे तालुकाध्यक्ष पोपट सरोदे, रिपाईचे विजय राजगुरू, घटनापती ग्रृपचे रवी भालेराव, नेवासे तालुका युवकाध्यक्ष संतोष कासोदे, गवई गटाच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, सारिका साळवे, सोनाली पवार, पावलस गोर्डे,माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे, डॉ. गणेश डांगे, पप्पू कांबळे, विजय गायकवाड, अॅड. राजेंद्र पंडीत, ज्येष्ठ नेते प्रभाकर खंडागळे आदी सहभागी होते.