RR vs DC IPL 2024: राजस्थानने सलग दुसऱ्यांना मैदान गाजवलं;दिल्लीवर १२ धावांनी मात

आयपीएलच्या १७ व्या मोसमातील नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर १२ धावांनी मात केली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्सला जिंकण्यासाठी १८६ धावांचं आव्हान दिलं होतं

0
RR vs DC IPL 2024
RR vs DC IPL 2024

नगर : आयपीएलच्या १७ व्या मोसमातील नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) १२ धावांनी मात केली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्सला जिंकण्यासाठी १८६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १७३ धावाच करता आल्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि अखेरीस ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी ४० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. मात्र या दोघांव्यतिरिक्त इतरांना विशेष कामगिरी करता आली नाही. राजस्थानने अशाप्रकारे या हंगामातील आपला सलग दुसरा सामना जिंकला. तर दिल्लीचा हा दुसरा पराभव ठरला आहे.

नक्की वाचा : ‘अमर सिंग चमकीला’चा ट्रेलर प्रदर्शित; दिलजीत-परिणीतीने जिंकलं मन  

शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरल्याने दिल्ली बाद (RR vs DC IPL 2024)

दिल्लीला विजयासाठी २० व्या ओव्हरमध्ये १७ धावांची गरज होती. तर मैदानात ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल ही जोडी खेळत होती. दिल्लीकडून आवेश खान याने २० ओव्हर टाकल्या. आवेशने आपल्या या ओव्हरमध्ये एकही बॉल मारायला दिला नाही. आवेश ही अखेरची ओव्हर निर्णायक ठरली. दिल्लीला विजयाची संधी होती. मात्र आवेशने मॅच फिरवली. आवेशने फक्त ४ धावाच दिल्या आणि राजस्थानच्या विजय पक्का झाला. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर ४९, मिचेल मार्श २३, कॅप्टन ऋषभ पंत २८, ट्रिस्टन स्टब्स ४४, अभिषेक पोरेल ९, अक्षर पटेल याने १५ धावा केल्या. तर राजस्थानकडून नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल या दोघांनी २-२ विकेट्स मिळवल्या. तर आवेश खान याने १ विकेट घेतली.

अवश्य वाचा :  पाय घसरून पडल्याने दिलीप वळसे पाटील जखमी  

राजस्थानची बॅट तळपली  (RR vs DC IPL 2024)

दिल्लीने टॉस जिंकून राजस्थान ला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानने या संधीचा फायदा घेत २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १८५ धावा केल्या. रियान पराग याने राजस्थानसाठी सर्वाधिक नाबाद ८४ धावांची खेळी केली. रियानच्या या खेळीत ७ चौकार आणि ६ सिक्सचा समावेश होता. तसेच यशस्वी जयस्वाल ५, जॉस बटलर ११, कॅप्टन संजू सॅमसन १५, आर अश्विन २९, ध्रुव जुरेल २० आणि शिमरॉन हेटमायर १४ धावा केल्या. तर दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नॉर्तजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या पाच जणांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here