नगर : आयपीएलच्या (IPL 2024) १७ व्या हंगामातील २४ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विजयरथाला रोखत गुजरात टायटन्सने ३ विकेट्सनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पराग सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातला १९७ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यावेळी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या राशीद खान याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नक्की वाचा : ‘संपदा पतसंस्था’ घोटाळा प्रकरण; पाच आरोपींना जन्मठेप
कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात ६४ धावांची भागीदारी (RR vs GT)
गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात ६४ धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतरही संघाला सतत धक्के बसत राहिले पण शेवटी सामना रोमांचक झाला. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने ७२ धावांची झंझावती खेळी केली. साई सुदर्शन यानं ३५ धावांचं योगदान दिलं. त्याशिवाय राहुल तेवतिया यानं ११ चेंडूमध्ये २२ धावांचं महत्वाचं योगदान दिलं. तर राशीद खानने ११ चेंडूमध्ये नाबाद २४ धावांची खेळी केली.
अवश्य वाचा : तरुणांमधील सुजय विखेंची क्रेझ विराेधकांसाठी डाेकेदुखी; सेल्फी काढण्यासाठी तरुणांचा गराडा
राशिद खानने गुजरातला मिळवून दिला सनसनाटी विजय (RR vs GT)
अखेरच्या षटकात गुजरातला १७ धावांची गरज होती. राजस्थान कडून आवेश खान गोलंदाजीसाठी आला होता. राहुल तेवातिया आणि राशिद खान यांनी आवेश खान याचीही पिटाई केली. अखेरच्या चेंडूवर चौकार मारत राशिद खानने गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. कुलदीप सेन यानं १९ व्या षटकांमध्ये नो चेंडू फेकला, त्यावर राशीद आणि राहुलने चार धावा वसूल केल्या. त्याशिवाय कुलदीपने याच षटकांमध्ये दोन चेंडू वाईड फेकले. त्याशिवाय आवेश खान यानेही एक चेंडू वाईड फेकला, त्यावरही अतिरिक्त धाव घेतली. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
आवेश खान आणि कुलदीप सेन यांना अखेरच्या दोन षटकांमध्ये ३७ धावांचा बचाव करता आला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात गुजरात टायटन्सचे गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसले. गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. अखेरच्या १२ चेंडूवर गुजरातला विजयासाठी ३७ धावांची गरज होती, त्यावेळी राहुल तेवातिया आणि राशिद खान फलंदाजी करत होते. या दोघांनी विजय खेचून आणला.