RR vs GT: गुजरात टायटन्स समोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान

आयपीएलचा १७ वा हंगाम रंजक होत चालला आहे. आज (ता.१०) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आमना सामना होणार आहे.

0
RR vs GT
RR vs GT

नगर : आयपीएलचा १७ वा हंगाम रंजक होत चालला आहे. आज (ता.१०) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यामध्ये आमना सामना होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर दोन्ही संघाची लढत होणार आहे. संजू सॅमसनचा विजयरथ शुभमन गिल रोखणार का ? याकडे आता क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. राजस्थानचा संघ आयपीएलच्या स्पर्धेत अव्वल आहे. त्यांनी आतापर्यंत चारही सामन्यात विजय मिळवला आहे.

नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; दोन अधिकारी जखमी

राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल (RR vs GT)

राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे शुभमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात संघ पाच सामन्यात चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. राजस्थानने आतापर्यंत चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर हेच सलामीला उतरतील. त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल तर चहल आणि अश्विन फिरकीची धुरा सांभाळतील.

अवश्य वाचा : ‘महापरिनिर्वाण चित्रपटातील ‘जय भीम’गाणं प्रदर्शित  

गुजरात संघाचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न (RR vs GT)

दुसरीकडे, गुजरातच्या संघाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.आतापर्यंतच्या पाच सामन्यांत गुजरातने दोन विजय मिळवले असून तीनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांना अनुक्रमे पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी पराभूत केले. त्यामुळे गुजरात संघाचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. गुजरातचा तारांकित लेग-स्पिनर रशीद खानने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here