RTO : पालकांनाे सावधान; अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे पडणार महागात

RTO : पालकांनाे सावधान; अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे पडणार महागात

0
RTO
RTO : पालकांनाे सावधान; अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे पडणार महागात

RTO : नगर : पालकांनाे सावधान (Beware); अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन (Vehicle) देणे आता पालकांना महागात पडणार आहे. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना २५ हजार रुपये दंड केला जाणार आहे. नवीन आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू हाेणार आहे. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊन नये, असे आवाहन आरटीओ (RTO) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; नगर, शिर्डी लाेकसभेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

वाहतूक नियमात बदल

वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहेत. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड होऊ शकतो, तसेच अशा वाहन मालकाचा वाहन परवाना देखील रद्द करण्यात येणार आहे. आता शाळा व महाविद्यालय सुरू होणार असून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

नक्की वाचा: 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात

अल्पवयीन गाडी चालविताना आढळल्यास 3 वर्ष तुरुंगवास (Beware)

या काळात पालक मुलांना कॉलेजला जाण्याची दुचाकी व चारचाकी वाहने देतात. हा कायद्याने गुन्हा आहे. मोटार वाहन कायदा( सुधारित )२०१९ नुसार, अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरुंगवास होऊ शकतो. हा तुरुंगवास तीन वर्षांपर्यंत आहे. याचबरोबर २५ हजार रुपये दंडाचीही तरतूद आहे. तसेच त्या अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here