RTO : नगर : अहिल्यानगर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) कार्यक्षेत्रात चारचाकी (Four Wheeler) पेक्षा दुचाकी (Two Wheeler) वाहनांना मागणी जास्त आहे. त्यातही मोटार सायकल खरेदीचे प्रमाण जास्त असल्याचे मागील सहा महिन्यांच्या आकडेवारीत समोर येत आहे. जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत ३१ हजार ७२४ वाहने विकली गेली. त्यातील १४ हजार २२९ मोटार सायकल आहेत. कार पेक्षा ट्रॅक्टरला (Tractor) मागणी जास्त आहे.
नक्की वाचा : कोतवाली पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
कार व जीप पेक्षा ट्रॅक्टर खरेदीकडे कल
अहिल्यानगर जिल्हा हा कृषीला व पूरक उद्योगांवर आधारित अर्थव्यवस्थेचा आहे. याचा परिणाम वाहन खरेदीवरही दिसून येत आहे. जिल्ह्यात मध्यमवर्गीय व शेती व्यवसाय करणारे अधिक असल्याने मोटर सायकल व ट्रॅक्टरला मागणी जास्त आहे. कारपेक्षाही ट्रॅक्टरला मागणी जास्त असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत दोन हजार ३१० कार विकल्या गेल्या आहेत. तर ३ हजार ३५९ ट्रॅक्टर विकले गेले आहेत. त्यामुळे कार व जीप पेक्षा ट्रॅक्टर खरेदीकडे जिल्ह्यात अधिक कल दिसून येत आहे.
अवश्य वाचा : आता ‘या’ राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार;सरकारची घोषणा
मागील सहा महिन्यांत विक्री झालेल्या वाहनांची संख्या (RTO)
मोटार सायकल – १४,२२९
स्कूटर – ७,६५०
मोपेट – ५९
कार – २,३१०
जीप – १,१९१
एसयूव्ही कार – ८१९
प्रवासी वाहने – ६२
ऑटो रिक्षा – १२८
बस – १२
मिनी बस – ७
स्कूल बस – ३
रुग्णवाहिका – ३
क्रेन – ७
ट्रक – ५७०
टँकर – २७
चारचाकी व्हॅन – ९६६
तीन चाकी व्हॅन – २३
ट्रॅक्टर – ३,३५९
ट्रॉली – ३५
इतर वाहने – २६४
एकूण – ३१,७२४