नगर : एआयएमआयएमच्या (AIMIM) वतीने गुरुवारी (ता.९) अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील मुकुंदनगर (Mukundnagar Sabha) येथे आयोजित करण्यात आलेल्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या सभेत पक्षाच्या महिला पदाधिकारी रुहीनाज शेख (Ruhinaz Shaikh) यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय भीम, जय शिवराय” या जयघोषाने केली, त्यांच्या या घोषणेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.
नक्की वाचा: “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे नव्हते – रुहीनाज शेख (Ruhinaz Shaikh)
रुहीनाज शेख यांनी केलेल्या घोषणेनंतर काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाले असावेत, हे ओळखून त्यांनी भाषणातच याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “एक बुरखेवाली इथे आल्यानंतर ‘जय शिवराय’ कसं म्हणू शकते, असं काही जणांना वाटलं असेल. पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे नव्हते. त्यांनी १२ बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्यामध्ये मुस्लिम समाजही होता,” असं त्यांनी ठामपणे सांगितले.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; सप्टेंबरच्या हफ्त्याची तारीख झाली जाहीर
‘आम्ही इथून एक इंचही हटणार नाही’ (Ruhinaz Shaikh)
रुहीनाज शेख यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर भर दिला. तसेच समाजात फूट पाडण्याच्या प्रवृत्तींवर सडकून टीका केली. “आज काही लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समाजाला वेगळं करण्याचा प्रयत्न चालतोय. पण आम्ही इथून एक इंचही हटणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. रुहीनाज शेख यांच्या भाषणाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.