Rule Change 2025 : गरिबांसोबत श्रीमंतांवर देखील करवाढीचा परिणाम होणार; 1 जानेवारी 2025 पासून होणार हे बदल

Rule Change 2025

0
Rule Change 2025 : गरिबांसोबत श्रीमंतांवर देखील करवाढीचा परिणाम होणार; 1 जानेवारी 2025 पासून होणार हे बदल
Rule Change 2025 : गरिबांसोबत श्रीमंतांवर देखील करवाढीचा परिणाम होणार; 1 जानेवारी 2025 पासून होणार हे बदल

Rule Change 2025 : नगर : येणाऱ्या नवीन वर्षात (New Year) म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक मोठे बदल (Rule Change 2025) लागू होणार आहेत. या बदलाची झळ सामान्यांसह श्रीमंतांनाही बसणार आहे. नविन वर्षात बदलणाऱ्या या नियमांमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीपासून ते UPI पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी कोणतीही कृती साखर कारखान्यांनी करू नये : जिल्हाधिकारी

कारच्या किमतीत वाढ

1 जानेवारी 2025 पासून, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवतील. कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो.

अवश्य वाचा : अनधिकृत फ्लेक्सवर मनपाचा कारवाईचा बडगा; १२ जणांवर गुन्हा दाखल

एलपीजीच्या किमतीमध्ये बदल (Rule Change 2025)

मागील काहीदिवसांपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अनेकवेळा बदल झाले आहेत. मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. 1 जानेवारी 2025 रोजी तेल विपणन कंपन्या आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत बदल होतील. यांचे नवीन दर जाहीर होतील. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे.

EPFO ​​पेन्शनधारकांसाठी नवा नियम
कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन काढणे सुलभ व्हावे यासाठी नवीन वर्षामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ​​कडून पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. EPFO ​​आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता नाही.

UPI 123Pay
UPI 123Pay चे नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI 123Pay हे फीचर फोनद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्यासाठी सुरू केले होते. त्याची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त 5,000 रुपये इतकी होती. आता फोनद्वारे 10,000 रुपयांपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.

शेअर बाजारात महत्वाचा बदल
सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सवरून मासिक एक्स्पायरीपर्यंत बदलण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे. तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी संपणार आहेत. दुसरीकडे, NSE निर्देशांकाने निफ्टी 50 मासिक करारांसाठी गुरुवार निश्चित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना हमीशिवाय दोन लाखांचे कर्ज
वर्षाच्या पहिल्या दिवसापासून, RBI शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. आरबीआयने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. यामुळे आता त्यांना 1.6 लाख नाही तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.