नगर : रशियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को (Mosco) शहरातील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये स्फोट (Explosion) आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांची आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा : विखेंना विरोध करणाऱ्या भुतारेंची मनसेतून हकालपट्टी
रशियन रॉक बँड पिकनिकच्या परफॉर्मन्ससाठी जमलेल्या गर्दीत हल्ला (Russia terrorist attack)
रशियन रॉक बँड पिकनिकच्या परफॉर्मन्ससाठी गर्दी जमली असताना हा हल्ला झालाय. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने ६० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती दिली. परंतु, हल्लेखोरांनी स्फोटके फेकल्यानंतर लागलेल्या आगीत आणखी लोक अडकले असण्याची शक्यता काही रशियन वृत्तपत्रांनी दिली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी १४५ जखमींची यादी जाहीर केली. त्यापैकी ११५ रुग्णालयात दाखल आहेत, ज्यात पाच मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैनिकांच्या वेशात अनेक जण कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी कॉन्सर्टमध्ये सहभागी होणाऱ्यांवर गोळीबार केला. या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओ फुटेजमध्ये लोकांचा जमाव हॉलमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येत आहे. एका व्हिडिओमध्ये हल्लेखोर दिसत आहेत.
हेही पहा : ६ डिसेंबरला ‘महापरिनिर्वाण’ होणार प्रदर्शित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला निषेध (Russia terrorist attack)
रशियाच्या काही लोकांनी यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केला आहे.मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. मॉस्कोतील भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. या दु:खाच्या क्षणी भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या जनतेच्या पाठीशी उभा आहे.