नगर : मागील अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. कारण रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा हल्ले (Attack) सुरू झाले असून हे हल्ले तीव्र करण्यात आलेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.१) युक्रेनच्या ईशान्येकडील खार्कीव्ह (Kharkiv City) शहरातील शॉपिंग मॉल आणि इव्हेंट कॉम्प्लेक्सवर हल्ला करण्यात आला आहे. रशियन क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात पाच मुलांसह ४७ जण जखमी (47 People Injured) झाले आहेत.
नक्की वाचा : आसाम सरकारचा मोठा निर्णय;नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद
खार्किव्ह शहरात हल्ला (Russia-Ukraine War)
या ड्रोन हल्ल्याबाबत अजून किवकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. युक्रेनने पॉवर प्लांट्स आणि तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य केल्याचे रशियाने म्हटले आहे. खार्किव्हमधील हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या सहयोगी देशांकडे विनंती केली होती की,कीवला पाश्चात्य देशांनी पुरवलेली क्षेपणास्त्रे शत्रूंच्या क्षेत्रामध्ये टाकण्याची परवानगी दिली होती. जेणेकरून रशियाचे सैन्य आणखी धोका कमी करू शकेल.
अवश्य वाचा : ‘पुरुषोत्तम’ करंडकच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड
रशिया-युक्रेनमधील संघर्ष वाढला (Russia-Ukraine War)
रशिया-युक्रेन युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. अडीच वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणखी वाढला आहे. रशिया पूर्व युक्रेनमध्ये आक्रमक पवित्रा घेत असून,सहा ऑगस्ट रोजी अचानक रशियन सीमेत घुसलेल्या युक्रेनच्या सैन्याला हुसकावून लावण्याचाही प्रयत्न केला आहे. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर युद्धातील सर्वात प्राणघातक हवाई हल्ले केले आणि ऊर्जा सुविधांसह अनेक लक्ष्यांवर हल्ला केला. मॉस्कोने नागरिकांना लक्ष्य केल्याच्या गोष्टीला नकार दिला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेनमधील संघर्ष सुरू झाल्यापासून त्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेन, जेथे देशांतर्गत ड्रोन उद्योग वेगाने विस्तारत आहे. त्याने रशियन ऊर्जा, लष्करी आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर हल्ले तीव्र केले आहे.