Rutuja Kadam : नवनागापूर गटात चांगले काम उभा करणार : ऋतुजा कदम

Rutuja Kadam : नवनागापूर गटात चांगले काम उभा करणार : ऋतुजा कदम

0
Rutuja Kadam : नवनागापूर गटात चांगले काम उभा करणार : ऋतुजा कदम
Rutuja Kadam : नवनागापूर गटात चांगले काम उभा करणार : ऋतुजा कदम

Rutuja Kadam : नगर : आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीनवनागापूर जिल्हा परिषद गटामध्ये (Navanagapur Zilla Parishad Gat) चांगले काम उभे करून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, तसेच युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे. आजच्या युवकांनी आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानेच (Social Activities) साजरा केला पाहिजे, असे प्रतिपादन ऋतुजा कदम (Rutuja Kadam) यांनी केले.

अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा

गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा व डोंगरगण ग्रामस्थांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी डोंगरगणचे माजी सरपंच कैलास पटारे, जालिंदर कदम, उपरसरपंच संतोष पटारे, सर्जेराव मते, पोपट गायकवाड, चंद्रभान कदम, धोंडीराम कदम, बाळासाहेब कदम, विलास भुतकर, इंद्रभान कदम, नामदेव कोकाटे, अक्षय कदम, कांताबाई भुतकर, मुख्याध्यापक यशवंत भुतकर आदीसह पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार

जालिंदर कदम म्हणाले, (Rutuja Kadam)

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघांमध्ये विकासाच्या योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजना नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले.


कैलास पटारे म्हणाले, सुजय विखे पाटील हे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रत्येक गावच्या विकासासाठी काम केले आहे. आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करीत या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे यासाठी काम केले आहे.