Paris Paralympics 2024:मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास,४०वर्षांनंतर भारताला मिळवून दिले पदक

0
Paris Paralympics 2024:मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास,४०वर्षांनंतर भारताला मिळवून दिले पदक
Paris Paralympics 2024:मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास,४०वर्षांनंतर भारताला मिळवून दिले पदक

नगर : भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला आहे. आता या स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये (Athletics) F४६ कॅटेगरीतील गोळाफेक प्रकारात मराठमोळ्या सचिन सर्जेराव खिलारीने (Sachin Khilari) १६.३२ मीटर गोळा फेकत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये सचिनने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात १६.३२ मीटर थ्रो केला आणि रौप्य पदकाला (Silver Medal) गवसणी घातली. मुख्य बाब म्हणजे त्याचं सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकलं.

नक्की वाचा : ‘एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ गाणं प्रदर्शित

पॅरिसच्या धर्तीवर गोळाफेक प्रकारातील फायनलमध्ये कॅनडाच्या च ग्रेग स्टीवर्टने १६.३८ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत सचिनसह मोहम्मद यासेर आणि रोहित कुमार यांनी देखील फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये मोहम्मद यासेर आठव्या स्थानी राहिला. तर रोहित कुमारला नवव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. तर मराठमोळ्या सचिनने घवघवीत यश मिळवलं आहे.

अवश्य वाचा : अनंत अंबानी यांची लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडावर नियुक्ती

सचिनचा पहिल्या प्रयत्नात १४.७२ मीटर लांब थ्रो (Paris Paralympics 2024)

गोळाफेक प्रकारातील फायनलमध्ये सचिनने पहिल्या प्रयत्नात १४.७२ मीटर लांब थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १६.३२ मीटर थ्रो केला. हा त्याचा फायनलमधील सर्वोत्तम थ्रो ठरला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने १६.१५ मीटर, चौथ्या प्रयत्नात त्याने १६.३१ मीटर, पाचव्या प्रयत्नात १६.०३ आणि सहाव्या प्रयत्नात त्याने १६.०३ मीटर लांब थ्रो केला. यासह १६.३२ मीटर लांब थ्रो सह त्याने रौप्य पदकावर नाव कोरलं.

सचिन खिलारी नेमका कोण ? (Paris Paralympics 2024)

अॅथलेटीक्समध्ये भारताने सर्वाधिक ११ पदकांची कमाई केली आहे.सचिनने जिंकलेले हे पदक भारतीय संघाचं पॅरालिम्पिक स्पर्धेतील २१ वं पदक ठरलं आहे. सचिन खिलारीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०२३ वर्ल्ड पॅरा अॅथलेटीक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या एफ ४६ गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने १६.२१ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here