नगर : देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) आडनाव जर देशमुख (Deshmukh) किंवा पाटील (Patil) असते तर हा सदाभाऊ कधीच आमदार झाला नसता,असं वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी केले आहे. सांगलीतील वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील आयोजित कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत बोलत होते. आपण अपघाताने आणि अपवादाने राजकारणात आलो आहोत, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार आणि मंत्री झालो. आता आमच्याकडे पद आहे म्हणून आमच्यामागे गडी आहेत, नाहीतरी कुणीही विचारत नाही असं देखील त्यांनी सांगितले.
नक्की वाचा : मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल?
देवेंद्र फडणवीस १८ पगड जातीला सोबत घेऊन जाणारे नेते (Sadabhau Khot)
देवाभाऊ माझ्यासाठी सावलीसारखे आहेत. त्यांचे आडनाव देशमुख किंवा पाटील असते तर हा सदाभाऊ कधीच आमदार होऊ शकला नसता. देवाभाऊंचे आडनाव फडणवीस आहे म्हणूनच आमच्याकडे पदे आहेत. देवेंद्र फडणवीस हे १८ पगड जातीला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत असं सदाभाऊ खोत म्हणाले.
अवश्य वाचा : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चित्रपटाचा गौरव
राजकारणामध्ये देवाभाऊ आधार (Sadabhau Khot)
राजकारण करताना कुणाचा तरी आधार लागतो, तो आधार मला देवाभाऊचा मिळाला. आम्ही खूप हाल काढले आहेत. मुळात आम्हाला या डब्यातच येऊ देत नाहीत. आमची परिस्थिती अशी आहे म्हणून इथे जागा मिळाली. आम्हाला जर कुणी नमस्कार केला नाही तर आम्हीच त्याला नमस्कार करतो. आमच्याकडे त्याने पाहिलं नाही तरीही आम्ही त्याच्याकडे पाहत बसतो, असं सदाभाऊ खोत यावेळी म्हणालेत.