Sadabhau Khot : आम्ही तीन पक्षांचं शेत नागंरुन दिलं.मात्र,आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले.आम्ही मात्र शेतात उभे आहोत. मात्र, प्रामाणिकपणे महायुतीसोबत उभे आहोत,असं म्हणत आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी नाराजी (Resentment) व्यक्त केली आहे.
नक्की वाचा : ‘धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार’;नितेश राणेंचा निर्धार
भाजपच्या मित्र पक्षांमध्ये नाराजी (Sadabhau Khot)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपूरमध्ये पार पडला. यानंतर भाजप, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये अन् त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय भाजपचे मित्र पक्षांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे. प्रथम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. आता विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील नांगरणीसाठी जी बैल वापरली गेली ती बैल बाजूला करुन ठेवली असल्याची खंत व्यक्त केली.
अवश्य वाचा : सावधान!२१ डिसेंबरपासून अवकाळी पावसाची शक्यता
‘दुसऱ्या वर्षी पेरणी होतीय का हे बघत राहायचं’ (Sadabhau Khot)
सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले की, मित्रपक्षांना तिन्ही पक्षांनी सामावून घेणं गरजेचं होतं. तीन पक्षांनी मित्रपक्षांसाठी काही मंत्रिपदं बाजूला काढून ठेवायला हवी होती. परंतु, दुर्दैवानं तसं झालं नाही. २४० लोक आपले निवडून आले आहेत, मंत्रिपदं देण्याला काही मर्यादा होत्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, कालांतरानं ही सगळी मंडळी कामात येतील. शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकलं नाही म्हणून पेरणी करायचं थांबत नाही. दुसऱ्या वर्षी पेरणी होतीय का हे बघत राहायचं,असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.