Sahakar Maharshi Cup: सहकारमहर्षी चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरु 

संगमनेर : क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहकारमहर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

0
सहकारमहर्षी चषक

संगमनेर : क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर (Cricket Association Of Sangamner)जयहिंद लोक चळवळ (Jay Hind People’s Movement) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहकारमहर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे (Leather Ball Cricket Tournament) आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर शहरात १ जानेवारी २०२४ पासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. या क्रिकेट थरारासाठी मैदानाची तयारी  करण्यात आली आहे. याची पाहणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे (MLA Satyajit Tambe) यांनी केली.

नक्की वाचा : भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरवात

सहकारमहर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची व नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. उत्तम दर्जाच्या संघाचा सहभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन व प्रचंड उत्साही प्रेक्षक ही या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस दोन लाख एक हजार रुपयांचे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी दरवर्षी किमान १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती असते. २०२३-२४ हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त संगमनेर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

अवश्य वाचा : शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडून स्वच्छता अभियान 


आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रिडा संकुल सज्ज झाले आहे. उत्कृष्ट नियोजनासह प्रेक्षकांची खास व्यवस्था खेळाडूंची व्यवस्था आदि कामांसह स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ या दरम्यान होणाऱ्या या सामन्याचे उद्घाटन आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत १ जानेवारीला सकाळी ९ वाजता या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध आयपीएल खेळाडू व रणजी खेळाडू यांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार यांचा सहभाग हे आकर्षण ठरणार आहे.

या स्पर्धेच्या तयारीची पाहणी आयोजक आमदार सत्यजित तांबे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तरी या क्रिकेटच्या स्पर्धेत जास्तीत-जास्त संघानी सहभाग घ्यावा व या टी ट्वेंटी स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here