Sahitya Awards : राजीव राजळे स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

Sahitya Awards : राजीव राजळे स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

0
Sahitya Awards

Sahitya Awards : नगर : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (Maharashtra Sahitya Parishad) नगर शाखेतर्फे यावर्षी साहित्य पुरस्काराची (Sahitya Awards) घोषणा करण्यात आली. यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यावेळी महाराष्ट्रातील 300 लेखकांनी आपल्या साहित्यकृती पाठवून सहभाग नोंदवला. यातून जे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्याची घोषणा आज साहित्य परिषदेचे (Literary Council) शाखाध्यक्ष किशोर मरकड व कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत जोशी यांनी केली.

हे देखील वाचा : ‘मै हू डाॅन’ गाण्यावर सुजय विखे, कर्डिलेंचा तुफान डान्स; चाहत्यांचा एकच जल्लाेष

स्वर्गीय राजीव राजळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार (Sahitya Awards)

हा पुरस्कार हे नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यप्रेमी स्वर्गीय राजीव राजळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध कादंबरीकार सुरेश पाटील यांना राजीव राजळे स्मृती साहित्य साधना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 11 हजार रुपये रोख मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचा वितरण समारंभ मार्च अथवा एप्रिलच्या महिन्यात होणार आहे.

नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार

यामध्ये साहित्यकृतीच्या विभाग वार पुरस्कार पुढील प्रमाणे (Sahitya Awards)


कादंबरी पुरस्कार 

  1. बाळासाहेब लबडे – गुहागर शेवटची लिओग्राफिया
  2. विलास शेळके – पुणे मोगलाई
  3. अशोक लिंबेकर- संगमनेर कोलाज
  4. जिल्हास्तरीय पुरस्कार- अशोक निंबाळकर – माहेलका
  5. विशेष कादंबरी पुरस्कार- भूपाली निसळ – नगर अनादिसिद्धा

कथा पुरस्कार

  1. भास्कर बंगाळे – सोलापूर, वाटणी
  2. लक्ष्मण दिवटे – आष्टी, उसवण
  3. मनोहर इनामदार – जामखेड, गवसणी

काव्य संग्रह

  1. माधुरी मरकड – पुणे, रिंगण
  2. गीतेश शिंदे – ठाणे, सी सी टी व्ही च्या गर्द छायेत 
  3. मंदाकिनी पाटील – बदलापूर, आत्मपीठ

प्रकाशन विभाग विशेष पुरस्कार

  1. बाळासाहेब घोंगडे – अक्षर वाडमय प्रकाशन, पुणे 

आत्मचरित्र 

  1. पोपट काळे – पुणे, काजवा 
  2. सुनील गोसावी – नगर, आठवणींचा डोह

विशेष चरित्र

  1. कै. शंकरराव घुले संघर्ष गाथा, संपादक – अविनाश घुले, नगर

संकीर्ण

  1. विनोद शिंदे – नगर, नॉट थिंग्स बट मेन 
  2. आशिष निनगुरकर – मुंबई, उजेडाच्या वाटा 

जीवन गौरव पुरस्कार 

  1. चंद्रकांत पालवे
  2. प्रा. मेधा काळे
  3. प्रा. खासेराव शितोळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here