Sai Jadhav: महाराष्ट्राच्या लेकीने रचला इतिहास!सई जाधव ठरल्या टेरिटोरियल आर्मीच्या पहिल्या महिला लेफ्टनंट

0
Sai Jadhav:महाराष्ट्राच्या लेकीने रचला इतिहास!सई जाधव ठरल्या टेरिटोरियल आर्मीच्या पहिल्या महिला लेफ्टनंट
Sai Jadhav:महाराष्ट्राच्या लेकीने रचला इतिहास!सई जाधव ठरल्या टेरिटोरियल आर्मीच्या पहिल्या महिला लेफ्टनंट

Sai Jadhav : देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये यावर्षी महाराष्ट्राच्या मुलीने एक ऐतिहासिक अध्याय (Historical chapter) लिहिला आहे. ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला ऑफिसर कॅडेटने या प्रतिष्ठित संस्थेत यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अभिमानाची बाब म्हणजे हा सन्मान महाराष्ट्राची कन्या असणाऱ्या कोल्हापूर येथील रहिवासी सई जाधव (Sai Jadhav) यांनी मिळवला आहे.

नक्की वाचा: शेतकऱ्याचा मुलगा आयपीएल गाजवणार; मराठमोळा खेळाडू ओंकार तारमळे नेमका कोण ? 

सई जाधव यांचं प्रशिक्षण नेमकं कसं होत ? (Sai Jadhav)

सई जाधव यांनी प्रादेशिक सैन्याच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता त्या लेफ्टनंट बनल्या आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा आणि SSB मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर सई जाधवची निवड झाली होती. IMA मध्ये त्यांनी सहा महिन्यांचे आव्हानात्मक लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कठीण होते.

सई जाधव नेमक्या कोण ? (Sai Jadhav)

सई जाधव या देशसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या जाधव कुटुंबातील चौथी पिढी ठरल्या आहेत. बेळगाव येथे शिक्षण आणि जडणघडण झालेल्या आणि मूळ कोल्हापूरच्या असलेल्या सई यांचे पणजोबा ब्रिटिश सेनेत, आजोबा भारतीय सैन्यात, वडील मेजर संदीप जाधव यांच्या सेवेच्या परंपरेला पुढे नेत सई यांनी सशस्त्र दलात नवा इतिहास घडवला आहे. त्यांनी प्रादेशिक सेनेच्या विशेष कोर्स अंतर्गत आपलं कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. १६ अधिकारी कॅडेट्समधून त्या एकमेव महिला होत्या, ज्या लेफ्टनंट बनल्या आहेत.

अवश्य वाचा:  शिल्पकलेचे उपासक राम सुतार काळाच्या पडद्याआड! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली अर्पण 

त्यांच्या पासिंग आऊट सोहळ्याच्या वेळी त्यांचे वडील मेजर संदीप जाधव यांनी त्यांच्या खांद्यावर लेफ्टनंचे स्टार लावले. ते देखील मेजर आहेत. सई यांच्या भारतीय सेनेतील प्रवेशामुळे महिलांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या वेळी एक मोठी घोषणा करण्यात आली की, जून २०२६ पासून सैन्याच्या महिला अधिकारी कॅडेट्स नियमितपणे पुरुषांसोबत आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतील आणि पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होतील.