Sai Tamhankar : ‘देवमाणूस’ (Devmanus Film) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.नुकतीच या चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ‘देवमाणूस’ मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.
नक्की वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष!
पहिल्यांदाच सई लोककला सादर करणार (Sai Tamhankar)
हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केले आहे. तर लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’चीही निर्मिती आहे.या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.‘देवमाणूस’ हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अवश्य वाचा : निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी;’बंजारा’चा टीझर प्रदर्शित
चित्रपटाबद्दल सई ताम्हणकर म्हणाली की,,, (Sai Tamhankar)
चित्रपटाबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी,यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल,याची मला खात्री आहे!”