Sai Tamhankar:देवमाणूसमध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

0
Sai Tamhankar: देवमाणूसमध्ये ‘आलेच मी' म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!
Sai Tamhankar: देवमाणूसमध्ये ‘आलेच मी' म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

नगर : मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षक आता पुन्हा एकदा लावणीच्या तालावर थिरकणार आहेत.अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ‘देवमाणूस’ (Devmanus Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटात ‘आलेच मी’ (Alech Mi) म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर ठेका धरला आहे. नुकतेच ‘देवमाणूस’ मधील ‘आलेच मी’ हे लावणी गीत (Lavani Song)प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का ? -विजय वडेट्टीवार  

चित्रपटात ‘हे’ कलाकार झळकणार (Sai Tamhankar)

लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई आता ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर आली आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्य रचना केली आहे. या भूमिकेसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे.

लावणी बद्दल सई म्हणाली की…  (Sai Tamhankar)

आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते,’देवमाणूस’मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशिषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल,अशी आशा आहे’.

                   ‘आलेच मी’ हे गाणे त्याच्या भन्नाट बीट्स, आकर्षक सादरीकरण आणि सईच्या जबरदस्त उपस्थितीमुळे लवकरच टॉप लिस्टमध्ये झळकणार आहे.