Sai Tamhnakar:सई ताम्हणकरच्या ‘मानवत मर्डर्स’मधील ‘समिंद्री’भूमिकेने जिंकलं प्रेक्षकांचं मन

0
Sai Tamhnakar:सई ताम्हणकरच्या 'मानवत मर्डर्स'मधील 'समिंद्री'भूमिकेने जिंकलं प्रेक्षकांचं मन
Sai Tamhnakar:सई ताम्हणकरच्या 'मानवत मर्डर्स'मधील 'समिंद्री'भूमिकेने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Sai Tamhnakar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मानवत मर्डर्स’ (Manvat Murders) या वेबसीरिजची. सत्य घटनेवर आधारित असलेल्या मानवत मर्डर्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. यातील “समिंद्री” (Samindri) अर्थात सई ताम्हणकर (Sai Tamhnakar) पुन्हा एकदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली. 

नक्की वाचा : ‘माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच’-अजित पवार

समिंद्री ने जिंकलं प्रेक्षकांचं मन ! (Sai Tamhnakar)

२०२४ हे वर्ष सईसाठी अनेक कारणाने खास आहे ते म्हणजे वैविध्यपूर्ण भूमिका आणि नवीन प्रोजेक्ट. त्यातला एक प्रोजेक्ट हा मानवत मर्डर्स. या वेबसीरिजच्या प्रत्येक फ्रेममध्ये सईने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहेच, पण सगळ्यात लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे सईचा लुक आणि तिची भाषा. सईने याआधी अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे ही भूमिका तिच्यासाठी किती आव्हानात्मक होती. तसेच या भूमिकेसाठी तिने खूप कष्ट देखील केले आहेत. भाषा आणि लुक या दोन गोष्टीचा समतोल साधत सईचा अभिनय हा सगळ्यांच्या मनात घर करून गेलाय.

विश्लेषकांनी सईचं विशेष कौतुक केलं आहे “सई ताम्हणकरने रंगवलेल्या समिंद्रीला तोड नाही. बोलीभाषेपासून वेषभूषेपर्यंत सई प्रत्येक बाबतीत चमकली आहे. या सगळ्या गर्दीत सई ताम्हणकरने साकारलेली समिंद्री अधिक लक्ष वेधून घेते” असं त्यांनी म्हटलं आहे. विश्लेषकाच्या सोबतीने सईच्या मित्रमंडळींनी देखील तिच्या नव्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. अभिनेता सुबोध भावेपासून भारती आचरेकर अशा अनेक कलाकारांनी सईला फोन मेसेज करून सांगितलं आहे. अगदी सोशल मीडियावरून देखील त्यांनी या समिंद्रीच कौतुक केलं आहे. सई आजच्या काळातली स्मिता पाटील आहे असं खूप जणांचं म्हणणं असून अश्या अनेक कॉम्प्लिमेंट तिला मिळाल्या आहेत. 

अवश्य वाचा : राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता,हवामान विभागाचा अंदाज

सई ताम्हणकर ‘या’ चित्रपटात झळकणार (Sai Tamhnakar)

कलाकार एखादी भूमिका साकारताना तिचा खोलवर अभ्यास विचार करतो असं म्हणतात पण खरंच सई तिच्या प्रत्येक लुकवर विचारपूर्वक अभ्यास करून ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते आणि दमदार परफॉर्मन्स देऊन जाते आणि म्हणून प्रेक्षकांना सई अधिक भावते. केवळ सौंदर्याची खाणच नाही तर अभिनयामध्येही सई जबरदस्त आहे हे अनेकांचे म्हणणे आहे. येणाऱ्या काळात सई बॉलिवूडसह मराठीत अनेक कमालीच्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. डब्बा कार्टेल, ग्राउंड झिरो, अग्नी, मटका किंग, गुलकंद अशा अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समध्ये ती आता कोणत्या वेगवेगळ्या भूमिका साकारणार हे बघणं उत्कंठावर्धक ठरेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here