Saibaba : शिर्डीच्या साईबाबांना तब्बल २९ लाखांचा साेन्याचा मुकुट; बंगळुरूमधील भक्ताकडून साईचरणी दान

Saibaba : शिर्डीच्या साईबाबांना तब्बल २९ लाखांचा साेन्याचा मुकुट; बंगळुरूमधील भक्ताकडून साईचरणी दान

0
Saibaba : शिर्डीच्या साईबाबांना तब्बल २९ लाखांचा साेन्याचा मुकुट; बंगळुरूमधील भक्ताकडून साईचरणी दान
Saibaba : शिर्डीच्या साईबाबांना तब्बल २९ लाखांचा साेन्याचा मुकुट; बंगळुरूमधील भक्ताकडून साईचरणी दान

Saibaba : नगर : देशविदेशातून असंख्य भक्त साईचरणी लीन होण्यासाठी येत असतात. साईचरणी (Saibaba) लीन झालेला भक्त आपापल्या परीने वस्तू किंवा रोख रकमेचे दान देत असतो, अशातच एका बंगळुरू (Bengaluru) मधील भक्ताने तब्बल २९ लाखांचा सोन्याचा मुकुट (golden crown) साईचरणी दान केला आहे.

हे देखील वाचा : नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ६३० कोटींच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

आज (ता. ९) बंगळुरू येथील राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी कोटा परिवाराकडून तब्बल २९ लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. आज साईंच्या मुर्तीवर हा मुकूट चढवण्यात आला होता. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतालाही शिर्डी देवस्थानकडून शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीमध्ये २३ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच याकाळात भक्तांनी तब्बल १६ कोटींचे दानही साईचरणी अर्पण केले.

नक्की वाचा : डॉक्टरांची मोलकरीणच घरफोडीची मास्टरमाईंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here