Saibaba Sansthan| राहाता: श्री साईबाबा संस्थानला (Saibaba Sansthan) जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून संस्थानला ॲानर सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे (Winners Book of World Record) अध्यक्ष व १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके (Dr. Deepak Harke) यांनी ॲानर सर्टिफिकेट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना प्रदान केले.
अवश्य वाचा- बहुचर्चित भागानगरे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू; नक्की काय घडलं जाणून घ्या…
आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव (Saibaba Sansthan)
यावेळी संस्थानचे प्र.उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्र. प्रशासकिय अधिकारी अतुल वाघ, मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक, सामाजिक व मानवसेवेतील योगदान अधोरेखित झाले आहे. भाविकांच्या सेवेसाठी संस्थान सातत्याने करत असलेल्या कार्याला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे.
नक्की वाचा- CM फडणवीस अन् गडकरींची मध्यस्थीने ठरलं रेवती सुळेंचं लग्न; शरद पवारांचे होणारे नातजावई सारंग लखानी कोण?



