Saif Ali Khan Discharged:जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज

0
Saif Ali Khan Discharged:जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज
Saif Ali Khan Discharged:जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर १६ जानेवारीला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला (attack) केला होता. त्यानंतर त्याला तात्काळ वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारासाठी दाखल करून त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अशातच आता सैफला डिस्चार्ज (Discharged) देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान,सैफवर त्याच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहजाद याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

नक्की वाचा : अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’मधील लूक आला समोर;दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत  

हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज (Saif Ali Khan Discharged)

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला २० जानेवारीला (सोमवारी) डिस्चार्ज दिला जाणार होता. पण, ऐनवेळी सैफचा रुग्णालयातील मुक्काम आणखी वाढला. अचानक डिस्चार्ज पुढे का ढकलण्यात आला? याचं कारण कळू शकलं नाही. मात्र,आज हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफवर चोरट्यानं केलेल्या चाकू हल्ल्यादरम्यान त्याच्या पाठीत धारदार शस्त्राचा तुकडा अडकला होता. तात्काळ शस्त्रक्रिया करुन तो तुकडा काढावा लागला. या हल्ल्यातून सैफ सुदैवाने बचावला, कारण त्याच्या पाठीच ज्या ठिकाणी शस्त्राचा तुकडा अडकला होता. तो त्याच्या मणक्यापासून फक्त दोन मीमी अंतरावर होता. सैफला पॅरालिसिसचा धोका होता.अशातच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून सैफ अली खानवर योग्य ते उपचार केले. आता सैफ बरा होऊन घरी परतला आहे. डॉक्टरांनी त्याला काही काळासाठी बेडरेस्टचा सल्ला दिला आहे.

अवश्य वाचा : पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण;महापालिका अलर्ट मोडवर  

पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या  (Saif Ali Khan Discharged)

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्यानंतर सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम आणि तैमूर रिक्षातून वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर खान कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तब्बल तीन दिवस मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पण,आरोपी गुंगारा देत होता.अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफिनं ठाण्यातील कासार वडवली इशून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here