Sainagar Shirdi Express : साईनगर, निजामाबाद गाड्यांना थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Sainagar Shirdi Express

0
Sainagar Shirdi Express
Sainagar Shirdi Express

Sainagar Shirdi Express : नगर : रेल्वे (Railway) प्रशासनाने अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रतिसाद देत दौंड-पुणे निजामाबाद एक्सप्रेस आणि दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस (Sainagar Shirdi Express) या गाड्यांना मतदारसंघातील विविध स्थानकांवर थांबे देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्रव्यवहार

खासदार निलेश लंके यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्रव्यवहार करून मतदारसंघातील प्रवाशांची मागणी मांडली होती. स्थानिक प्रवासी, कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी यांना रेल्वे गाड्या त्यांच्या स्थानकावर थांबत नसल्याने दूरवर प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम अधिक लागत होते.

अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी

दोन गाड्यांना थांबा (Sainagar Shirdi Express)

या मागणीवर खासदार लंके यांनी पुढाकार घेत या दोन गाड्यांना राहुरी, वांबोरी, विळद, सारोळा, अकोळनेर, रांजणगाव रोड, विसापूर, बेलवंडी, श्रीगोंदा रोड, काष्टी, येथे थांबा देण्याची मागणी केली होती. रेल्वे प्रवाशांनी खासदार लंके यांच्या या मागणीची दखल घेत अहिल्यानगर मतदारसंघातील विविध स्थानकांवर थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दौंड, पुणे निजामाबाद एक्सप्रेसला काष्टी, बेलवंडी, रांजणगावरोड, सारोळा, अकोळनेर, विळद, वांबोरी, पढेगांव  व चितळी येथे थांबा मंजुर करण्यात आला. दुसरीकडे दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला राहुरी येथे थांबा मंजुर करण्यात आला आहे.