Sainagar Shirdi Express : राहुरी : राहुरी रेल्वे स्टेशन (Rahuri Railway Station) येथे नव्याने थांबा मिळालेल्या मुंबई-शिर्डी साई फास्ट पॅसेंजर (Sainagar Shirdi Express) या रेल्वे गाडीचे ग्रामस्थांच्या वतीने रेल्वेचे चालक, वरिष्ठ अधिकारी व रेल्वे स्टेशन (Railway Station) व्यवस्थापक यांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले.
नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गाजला
ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
राहुरी रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अनेक गाड्यांच्या थांब्याची मागणी असताना राहुरी रेल्वे स्टेशन येथे 3 सप्टेंबर पासून शिर्डी-मुंबई साई फास्ट पॅसेंजर या रेल्वे गाडीला थांबा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मुंबई शिर्डी साई फास्ट पॅसेंजर ही रेल्वे गाडी राहुरी रेल्वे स्टेशन येथे दाखल झाली. यावेळी भल्या पहाटेपासूनच ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून या रेल्वे गाडीचे जोरदार स्वागत केले. साईबाबांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. रेल्वेचे पुणे विभागाचे सीनियर डीएमई, रेल्वे चालक श्रीकांत दीक्षित, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक सचिन शर्मा, रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रमोद खाडे यांचा ग्रामस्थांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.
अवश्य वाचा : श्रीरामपूर शहरात पोलिसांचे पथसंचलन
आठवड्यातील ४ दिवस गाडी सेवेत उपलब्ध (Sainagar Shirdi Express)
याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अशोक काळे, भाजपाचे तालुका मंडल अध्यक्ष धनंजय आढाव, जिल्हा चिटणीस रवींद्र म्हसे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे, प्रमोद खडके, उत्तम बनसोडे, संतोष पवार, आप्पा लोखंडे, रमेश लोखंडे, कांतीलाल डुक्रे, बाळासाहेब कदम, दीपक बलसाने, बादल शिंदे, चरण धागुडे, सतीश चितळकर, सोपान निकम, एजाज पठाण, अनिल गायकवाड, राम चेखलिया, पत्रकार विनीत धसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रविवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार आठवड्यातील हे चार दिवस सदर गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध राहणार असून गाडीला थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच नेत्यांचे, रेल्वे सल्लागार समितीचे सर्व सदस्य, रेल्वे प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.