Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराजांचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराजांचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

0
Saint Sheikh Muhammad Maharaj

Saint Sheikh Muhammad Maharaj : श्रीगोंदा : तालुक्यासह राज्यात प्रसिद्ध (Famous) असलेले हिंदु-मुस्लिम ऐक्याचा (Hindu-Muslim unity) संदेश देणारे संत शेख महंमद महाराज (Saint Sheikh Muhammad Maharaj) यांचा यात्रोत्सव निमित्ताने श्रीगोंद्यात लाखो भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले. दोन दिवसीय यात्रा उत्सवाच्या निमित्ताने श्रीगोंद्याच्या बाजारपेठेत विक्रमी उलाढाल झाली. मंदीर परिसरात यात्राकमिटीने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.

नक्की वाचा : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार

शेख महंमद बाबा यांच्या वंशजांच्या हस्ते पूजन (Saint Sheikh Muhammad Maharaj)

शेख महंमद बाबा ट्रस्ट तर्फे सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या ४०६ व्या संदल-उर्स/यात्रा उत्सवानिमित्त १८ मार्च रोजी नागपूरचे प्रसिद्धी कव्वाल युसुफ शोला कव्वाली कार्यक्रम पार पडला. कव्वाली कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे शेख महंमद बाबा यांच्या वंशजांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बुधवारी (ता.२०) पहाटे शेख महंमद महाराजांच्या समाधीस्थळावर शेरा चादर चढवुन यात्रा उत्सवास प्रारंभ झाला. दिवसभर विविध मंडळांनी शेरणी वाटप व नागरिकांनी नवस पुर्ती केली. पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या हस्ते मानाची चादर अर्पण केली. साळवण देवी रोड मंडळाने अकराशे तरुणांच्या उपस्थित शेरणी वाटप केले. श्रीगोंदा, दौड, शिरुर, आष्टी, कर्जत, जामखेड तसेच पुणे, मुंबई कल्याणवरुन मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते.

हे देखील वाचा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Saint Sheikh Muhammad Maharaj)

आमदार बबनराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, डाॅ. प्रणोती जगताप, मनोहर पोटे, ज्योती खेडेकर, बापू गोरे, अशोक खेंडके, बाळासाहेब दुतारे,  प्रशांत दरेकर यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळ मोटे पाटील ट्रस्टचे अध्यक्ष अमिन शेख, अशोक आळेकर, पोपटराव खेतमाळीस व सहकाऱ्यांनी भाविकांचे स्वागत केले. रात्री महाराजांच्या अश्वची मिरवणूक काढण्यात आली. लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. तर गुरुवारी (ता.२१) दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. यावेळी या कुस्ती आखाड्याला राज्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here