Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा

Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा

0
Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा
Saint Sheikh Muhammad Maharaj : संत शेख महंमद महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा

Saint Sheikh Muhammad Maharaj : नगर : अनेक लोक जन्माला येतात आणि मरतात मात्र, ज्यांनी समाजासाठी विशेष कार्य केले तेच या समाजात विचार रुपाने कायम राहतात. त्यांच्या लिखित साहित्यामुळेच आज ते किर्तीरुपाने आहेत. आज तरुणांसमोर अनेक गंभीर प्रश्न असूनही ते मोबाईलमध्ये दंग आहेत. तरुण व्यसनाधिनतेकडे (Addicted) वळत आहे. यापासून परावृत्त होऊन संत विचारांची कास धरण्याची गरज आहे. त्यातूनच प्रगती साध्य करता येईल, असे मत सिद्धीनाथ मेटे महाराज (Siddhinath Mete Maharaj) यांनी व्यक्त केले.

संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जन्मोत्सवाच्या कीर्तन सेवेत ते बोलत होते. त्यांनी शेख महंमद महाराजांच्या (Saint Sheikh Muhammad Maharaj) जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. महाराजांचे दुर्लक्षित साहित्य वाचकांच्या समोर यावं, यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात आली असून तिला गती देण्याचं आवाहन त्यांनी केले.

नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू; कोलकाता येथे होणार अंत्यसंस्कार

ग्रामस्थ उपस्थित

यावेळी प्रतिष्ठानचे सचिव किसन आटोळे सर, सदाशिव पगारे सर, सोमनाथ शेलार सर, पांडूरंग गावडे, डॉ. कवडे सर, गंगाधर आटोळे, भाऊसाहेब झांजे, योगेश झांजे, प्रा. सिताराम झांजे, फकड झांजे, पोपट थोरवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. समाधान महाराज नाडकर, सुखदेव महाराज झांजे, सुभाष महाराज थोरवे, ज्ञानदेव झांजे, रेवन्नाथ मेटे, शेषराव आटोळे, आजिनाथ गाडे, दत्तात्रय खांदवे महाराज आदींनी किर्तन साथ संगत केली.

अवश्य वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

महाप्रसादाचे वाटप (Saint Sheikh Muhammad Maharaj)

संत शेख महंमद महाराजांचे जन्मगाव असलेल्या वाहिरा या गावी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी महाआरती, समाधी स्थळावरती चादर, पुष्पहार अर्पण करण्यात आली. ग्रामप्रदक्षिणा झाली. त्यानंतर मेटे महाराज यांचे किर्तन झाले. लोकवर्गणीतून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद…

संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठान व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मोत्सवानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 40 वारकरी रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून गरजू रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश माळशिकारे, किरण बोंद्रे, सुनिल झांजे, राजु झांजे आदींनी परिश्रम घेतले.