
Saint Sheikh Muhammad Maharaj : श्रीगोंदा : येथील आराध्य दैवत श्री संत शेख महंमद महाराज (Saint Sheikh Muhammad Maharaj) यांच्या यात्रा उत्सवानिमित्त महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी (Vriddheshwar Urban Multistate Society) आणि चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांद्वारे विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स (Food Stalls) सुरू करण्यात आले आहेत.
नक्की वाचा : श्रीगोंद्यातील आरोग्य प्रश्नावर आमदार विक्रम पाचपुते यांची लक्षवेधी; रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे या स्टॉलचे उद्देश
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक विठ्ठलराव वाडगे आणि चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था चेअरमन रुक्मिणी वाडगे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यात्रेमध्ये पाणीपुरी, पावभाजी यासह विविध चविष्ट खाद्य पदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉलचे उद्देश ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Saint Sheikh Muhammad Maharaj)
हे स्टॉल्स (ता. २६) फेब्रुवारी ते (ता. २८) फेब्रुवारी पर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे. विठ्ठलराव वाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बचत गटांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक बळ दिले जात आहे. याप्रसंगी भाविक, स्टॉल धारक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेत येणाऱ्या भाविकांनी या महिला उद्योजकांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


