Man Vitthal Vitthal Gai:’मन विठ्ठल विठ्ठल गाई’ गाण्यात झळकला  बालकलाकार साईराज केंद्रे

सप्तसूर म्युझिकतर्फे 'मन विठ्ठल विठ्ठल गाई' हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. बालगायक जयेश खरेने हे गाणं गायलं आहे.

0
Man Vitthal Vitthal Gai :'मन विठ्ठल विठ्ठल गाई' गाण्यात झळकला  बालकलाकार साईराज केंद्रे
Man Vitthal Vitthal Gai :'मन विठ्ठल विठ्ठल गाई' गाण्यात झळकला  बालकलाकार साईराज केंद्रे

नगर : आषाढी वारीमुळे (Ashadhi Vari) सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठूनामामध्ये दंग झालेला आहे. या निमित्ताने सप्तसूर म्युझिकतर्फे (Saptsur Music) ‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’ हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. बालगायक जयेश खरेने (Jayesh Khare) हे गाणं गायलं आहे. तर बालकलाकार साईराज केंद्रे (Sairaj Kendre) या म्युझिक व्हिडिओमध्ये चमकला आहे. 

नक्की वाचा : गणेशोत्सवात मिळणार आनंदाचा शिधा!

‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’ गाण्यात साईराज केंद्रे मुख्य भूमिकेत (Man Vitthal Vitthal Gai)

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी ‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नवनाथ निकम यांनी, राज रणदिवे यांनी गीतलेखन, विशाल – समाधान यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये साईराज केंद्रे, पियुषा पाटील, सुहास जाधव, कोंडू तात्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कैलाश पवार यांनी छायांकन केलं आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस घेऊन लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने निघतात. आषाढी एकादशी हा केवळ पंढरपूरचाच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचा सोहळा असतो, भक्तीचा उत्सव असतो.

अवश्य वाचा : देशात मुसळधार पावसाच्या सरी बरसणार;’या’राज्यात अधिक पावसाचा अंदाज

‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’ गाण्यात प्रेक्षक दंग  (Man Vitthal Vitthal Gai)

सप्तसूर म्युझिकचा प्रत्येक म्युझिक व्हिडिओ खास असतो. त्याप्रमाणेच आषाढी वारीच्या औचित्याने ‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’ हा म्युझिक व्हिडिओ वेगळा आहे. या म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून एका मुलाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. घरी बसून विठ्ठलाची मूर्ती तयार करत बसलेला मुलगा दिंडीसमवेत पंढरपुरात पोहोचतो आणि काय होतं हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने विठूनामामध्ये तल्लीन होताना ‘मन विठ्ठल विठ्ठल गाई’  हे गाणं पाहण्याचा मोह आपल्याला आवरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here