Sairat Movie: सैराटला आठ वर्षे पूर्ण;आर्चीने दिला जुन्या आठवणींना उजाळा 

'सैराट' या चित्रपटाला आज तब्बल आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

0
Sairat Movie
Sairat Movie

नगर : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाला आज तब्बल आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आठ वर्षानंतर आजही चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाल्याने आर्चीने काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘सैराट २’ची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

नक्की वाचा : चेन्नईचा हैदराबादवर दणदणीत विजय;तुषार देशपांडेची तुफान खेळी  

सैराटने महाराष्ट्राला लावले वेड (Sairat Movie)

‘सैराट’ या चित्रपटाने मराठी मनोरंजन सृष्टीला वेड लावले होते. या चित्रपटामुळे सिनेमागृहात एखाद्या जत्रेपेक्षा जास्त दंगा पहायला मिळाला. गावाकडची मंडळी ट्रॅक्टरवर बसून थिएटरला जाताना दिसून आली. ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आर्ची-परश्याची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या सगळ्या गोष्टीला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत.

ग्रामीण जीवनावर आधारित सैराट (Sairat Movie)

‘सैराट’ चित्रपटाने अनेक समीकरणे बदलली. एकूणच रंग, जात, राजकारण, भाषा, संगीत ग्रामीण व्यवस्था आणि स्त्रीवाद अशा अंगाने बरीच चर्चा राज्यभर झाली. ‘सैराट’ नंतरच ग्रामीण प्रादेशिक भाषा मराठी डेलीसोप मध्ये आली आणि रूढ झाली. चित्रपटाने कणखर नायिका सुद्धा सेट करून दिली. आता चाहत्यांना या बहुचर्चित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘सैराट’चं यश हे त्याच्या ‘थेट’ पणामुळे आहे. 

अवश्य वाचा : यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पूर्वपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here