Sajan Pachpute : विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार : साजन पाचपुते

Sajan Pachpute : विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार : साजन पाचपुते

0
Sajan Pachpute : विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार : साजन पाचपुते
Sajan Pachpute : विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार : साजन पाचपुते

Sajan Pachpute : श्रीगोंदा: स्वर्गीय सदाअण्णा पाचपुते यांनी तालुक्यात केलेले काम सर्वाना ज्ञात आहे. त्यामुळे कोणी कितीही ताकद लावली तरी सामान्य जनता आपल्या बरोबर आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) उपनेते साजन पाचपुते (Sajan Pachpute) यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या ५८ व्या वर्धापनानिमित्त (Shiv Sena Vardhapan Din) शिवसेना जिल्हाउपप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, यावेळी साजन पाचपुते बोलत होते.

नक्की वाचा: फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णी

साजन पाचपुते म्हणाले,

विधानसभा निवडणुकीत विरोधकांसमोर मोठा स्पर्धक तयार झाल्यामुळे मला बदनाम करण्यासाठी काहीनी षडयंत्र चालू केले आहे. पण मी कोणाला घाबरणारा नाही. श्रीगोंदा विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे. तळागाळातील सामान्य लोकांची कामे करुन पुढे येणाऱ्यांना घडवायचे आहे. पक्षात कोणावरही अन्याय होणार नाही. यापुढे तालुक्यात ग्रामपंचायत, सेवासंस्था निवडणुकीत उभे राहा, ताकद देण्यासाठी मी बांधिल राहील. यावेळी बाळासाहेब दुतारे, विजय शेंडे, संतोष खेतमाळीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नगर, श्रीगोंदा मतदारसंघातील शिवसैनिक उपस्थित होते.

Sajan Pachpute : विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार : साजन पाचपुते
Sajan Pachpute : विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार : साजन पाचपुते

अवश्य वाचा : माझं लाेकसभेतलं पहिलं भाषण इंग्रजीतच : नीलेश लंके

शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Sajan Pachpute)

यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गोरे, अंबादास पाचपुते, संतोष खेतमाळीस, नितीन शिंदे, श्रीराम म्हस्के, सुरेश देशमुख, शिवाजी समदडे, जमीर शेख, रविंद्र दांगट, नितीन ढमे, सोमनाथ टिमुणे, लालासाहेब दांगट, दिलीप कर्डिले, दिलीप आनंदकर, किरण कुरुमकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी राऊत यांनी केले. तर भाऊसाहेब गोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here