Sajan Pachpute : साजन पाचपुते यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

Sajan Pachpute : साजन पाचपुते यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

0
Sajan Pachpute : साजन पाचपुते यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द
Sajan Pachpute : साजन पाचपुते यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द

Sajan Pachpute : श्रीगोंदा : सलग तीन मासिक सभेस गैरहजर असल्या कारणाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena UBT) उपनेते साजन पाचपुते (Sajan Pachpute) यांचे आमदार पाचपुते (Vikram Pachpute), माजी आमदार जगताप आणि नागवडे गटाच्या संचालकांनी एकमताने संचालक पद रद्द करण्याचा ठराव केला. यामुळे साजन पाचपुते यांना मोठा धक्का बसला आहे.

नक्की वाचा : नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर

संचालक पद रद्दच्या ठरावावर स्वतः साजन पाचपुते यांचीच सही

शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांचे संचालक पद रद्द होणे धक्कादायक असतानाच मांडलेल्या संचालक पद रद्दच्या ठरावावर स्वतः साजन पाचपुते यांनीच सही केली आहे. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा सोमवारी (ता.२४) बाजार समितीचे सभापती प्रविण लक्ष्मण लोखंडे यांचे अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

अवश्य वाचा : ‘मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं’-अजित पवार

ठराव एकमताने मंजुर करण्यात आला (Sajan Pachpute)

या मासिक सभेत विषय पत्रिकेतील विषयानुसार बाजार समितीच्या दिनांक २५/१०/२०२४, दिनांक २७/१२/२०२४ व दिनांक २५/०२/२०२५ या सलगच्या तीन मासिक सभेस गैरहजर असल्याने शिवसेना उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांचे संचालक पद रद्द करण्याचा मांडण्यात आलेला ठराव एकमताने मंजुर करण्यात आला. सभेस उपसभापती मनिषा मगर, दिपकराव भोसले पाटील, दत्तात्रय पानसरे, भास्करराव वागस्कर, अजितराव जामदार, नितीन डुबल, बाबासाहेब जगताप, रामदास झेंडे, अंजली रोडे, दत्तात्रय गावडे, महेश दरेकर, लक्ष्मण नलगे, प्रशांत ओगले, लौकीक मेहता, आदिक वांगणे, किसन सिदनकर सर्व १८ संचालक उपस्थित होते.