Sakal Hindu Morcha : सकल हिंदू मोर्चाच्या निमित्ताने तनपुरे व कर्डिले एकत्र

Sakal Hindu Morcha : सकल हिंदू मोर्चाच्या निमित्ताने तनपुरे व कर्डिले एकत्र

0
Sakal Hindu Morcha : सकल हिंदू मोर्चाच्या निमित्ताने तनपुरे व कर्डिले एकत्र
Sakal Hindu Morcha : सकल हिंदू मोर्चाच्या निमित्ताने तनपुरे व कर्डिले एकत्र

Sakal Hindu Morcha : राहुरी: कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे पोस्टर फाडून विटंबना केल्याप्रकरणी तसेच बांगलादेश (Bangladesh) येथे हिंदू बांधवांवर सुरु असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या उपस्थितीत राहुरी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सकल हिंदू समाजाच्या मोर्चा (Sakal Hindu Samaj Morcha) निमित्ताने प्राजक्त व हर्ष तनपुरे आणि अक्षय कर्डिले काही वेळासाठी एकत्र आले होते.

अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

हिंदू बांधवांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराचा निषेध

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोस्टर फाडून विटंबना केल्याची घटना समोर आली. तसेच बांगलादेश येथे हिंदू बांधवांवर वारंवार अत्याचार होत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ राहुरी शहरातील पाच नंबर नाका येथे शेकडोच्या संख्येने हिंदू बांधव जमा झाले. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन महिलांच्या हस्ते पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध

यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, (Sakal Hindu Morcha)

सरकारने आता संयमाची भूमिका सोडून द्यावी. बांगलादेश येथील आमच्या हिंदू बांधवांवर अत्याचार करणाऱ्या तेथील मुजोर लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी. हिंदु बांधवांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, यासाठी केंद्र सरकारने भूमिका घेतली पाहीजे.

अक्षय कर्डिले म्हणाले की, (Sakal Hindu Morcha)

भारत देशाबरोबरच बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. या सर्व घटना आता थांबल्या पाहिजेत. अन्यथा आम्हाला हातात दांडे घ्यायला वेळ लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात उठणारा आवाज चिरडायला वेळ लागणार नाही.  

याप्रसंगी हर्ष तनपुरे म्हणाले की, आरोपींना शिक्षा झाली तरच या घटना थांबतील. बांगलादेशातील मुद्दा हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. त्यात केंद्र सरकारने जास्त लक्ष घालणे महत्वाचे आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकाने तातडीने कारवाई करावी, असे हर्ष तनपूरे म्हणाले.

यावेळी राहुरी नगरपरिषदचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नगरसेवक सागर तनपुरे, राजूभाऊ शेटे, गजानन सातभाई, अविनाश म्हस्के, प्रतीक तनपुरे, प्रदिप भुजाडी, प्रशांत डौले, राजेंद्र उंडे, अरुण तनपुरे, माजी नगरसेवक दादापाटील सोनवणे, सुर्यकांत भुजाडी, नंदुभाऊ तनपुरे, सुनील पवार, प्रकाश देठे, पांडूभाऊ उदावंत, विजय तमनर, गणेश धाडगे, नरेंद्र शेटे, गणेश खैरे, सुरेश बानकर, सचिन मेहेत्रे, सतिष फुलसौंदर, सुजीत काळे, अजित डावखर, उमेश शेळके, गणेश कोहकडे, निलेश शिरसाठ, अरुण ठोकळे, गोपी दहिवाळकर, भाऊ उंडे, सौरभ फंड, अमोल काशीद आदीसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.