Saksham Tate Murder Case: सक्षम ताटे हत्या प्रकरणात मोठा खुलासा,मामिडवार कुटुंबाची धर्मांतराची ऑफर

0
Saksham Tate Murder Case: सक्षम ताटे हत्या प्रकरणात मोठा खुलासा,मामिडवार कुटुंबाची धर्मांतराची ऑफर
Saksham Tate Murder Case: सक्षम ताटे हत्या प्रकरणात मोठा खुलासा,मामिडवार कुटुंबाची धर्मांतराची ऑफर

नगर : नांदेड येथील सक्षम ताटेच्या हत्याकांडाने (Saksham Tate Murder Case) महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सक्षम आणि आचलचे नाते परस्पर संमतीने असल्याचे एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगूनही आंचलच्या (Anchal Mamidwar) कुटुंबाने हे प्रकरण पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मामिडवार कुटुंबाने सक्षमला धर्मांतराची ऑफर (Offer to convert) दिल्याचा धक्कादायक उलगडा याप्रकरणात झाला आहे.

नक्की वाचा : आता घरी गेल्यावर बॉसचा फोन उचलणं बंधनकारक नाही,राईट टू डिस्कनेक्ट विधेयक काय ?  

पोक्सो लागू करण्याची केली मागणी (Saksham Tate Murder Case)

आचल मामिडवार आणि सक्षम ताटे यांची ओळख २०२२ मध्ये झाली. दोघांचे प्रेम घट्ट झाल्यानंतर आंचलच्या कुटुंबाने तिला घरात बंद करून ठेवले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबाने सक्षमवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण हाताळणाऱ्या एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगितले होते की, दोघांचे नाते हे परस्पर संमतीने आहे. पोक्सो लागू होत नाही. परंतु आचलच्या कुटुंबाने हे ऐकण्यास पूर्ण नकार देत सक्षमविरुद्ध तक्रार कायम ठेवली. जेव्हा आंचल १८ वर्षांची झाली, तेव्हा तिने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन POCSO प्रकरण मागे घेण्याची मागणी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

अवश्य वाचा: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे २०२६ मध्ये अनावरण होईल – देवेंद्र फडणवीस   

सक्षमला धर्मांतराची दिली ऑफर (Saksham Tate Murder Case)

सक्षमचे कुटुंब बौद्ध असून आचलचे कुटुंब पद्मशाली हिंदू आहे. जातभेद आणि प्रतिष्ठा या कारणांमुळे मामिडवार कुटुंब या नात्याला तीव्र विरोध करत होते. या विरोधात त्यांनी सक्षमवर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे मामिडवार कुटुंबाने सक्षमला हिंदू धर्म स्वीकारल्यास नातेसंबंध मान्य करू असे सांगितले होते. सक्षमनेही आचलसाठी धर्मांतर करण्याची तयारी दर्शवली, परंतु कुटुंबाने दाखवलेला स्वीकार हा केवळ नाटक असल्याचे नंतर उघड झाले.