Salary Increment : नगर : महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉइज असोसिएशनच्या (Maharashtra Rajya Mobile Tower Technical Employees Association) वतीने राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पगारवाढ (Salary Increment), बोनस आणि सुट्ट्यांच्या वेतनाची मागणी करत अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरील (Ahilyanagar-Sambhajinagar Highway) शेंडी बायपास येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अवश्य वाचा: सफाई काम करणाऱ्या महिलेची मुलगी झाली क्लास वन अधिकारी
पगारात कपात केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार अॅड. श्रीरंग गिते, तसेच सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, शामसुंदर जाधव, अश्फाक शेख, नारायण पाटील, किरण निकम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. अल्टीस, पीटीपीएल, आयडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह विविध मोबाईल टॉवर कंपन्यांमध्ये कार्यरत तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून योग्य पगारवाढ देण्यात आलेली नाही. उलट, कामाच्या वाढत्या ताणामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दरमहा ५०० ते ६००० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नक्की वाचा : “पंकजा मुंडेंना गृहमंत्री तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”
आश्वासन देऊनही दिवाळी बोनस आणि सुट्टीचे पैसे नाही (Salary Increment)
तसेच वर्ष २०२५ मधील सर्व रजा व राष्ट्रीय सुट्ट्यांचे सुमारे ११ हजार ४०० रुपयांचे वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी बोनस आणि सुट्टीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अद्याप दिलेले नसल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जर मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत तर राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.



