Salman Khan : अहिल्यानगर : सिनेअभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा अंगरक्षक असलेल्या ‘शेरा’ (Shera) याला विधानभवनात पाहण्यात आले आहे. सलमानच्या अंगरक्षक (Bodyguard) शेराने विधानभवनात (Vidhan Bhavan) येत नेत्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
नक्की वाचा : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर
लॉरेन्स बिष्णोई गँगपासून धोका
शेराचे विधान भवनात येण्याचे नेमके कारण समजू शकले नाहीये. परंतु, सलमान खान याला येणारया धमक्या, लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असलेला धोका यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भातच त्याने नेत्यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.
अवश्य वाचा : ‘आरडी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित;२१ मार्चला चित्रपट होणार प्रदर्शित
सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या (Salman Khan)
काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर झालेला गोळीवर असो किंवा, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या असो याची जबाबदारी लाँरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली होती. तसेच सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळेच सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठीच शेराने नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याची चर्चा आहे.