Salman Khan: सलमान खानचे चाहत्यांना मोठे गिफ्ट;ईदनिमित्त केली नव्या चित्रपटाची घोषणा

सलमान खानचा नवीन चित्रपट पुढच्या वर्षीच्या ईदच्या मूहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने सोशल मीडियावर नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

0
Salman Khan
Salman Khan

नगर : बॉलिवूड भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानने ईदच्या (Eid) निमित्ताने चाहत्यांना खास भेट दिली आहे. दरवर्षी ईदच्या दिवशी सलमान खानचा एक नवा चित्रपट प्रदर्शित होतो. परंतु यंदा त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मात्र आता सलमान खानने ईदच्या दिवशी चाहत्यांना नवीन चित्रपटाची (New Movie) घोषणा करत खुशखबर दिली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय;‘पीएसआय’ पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर  

सलमानचा ईदच्या मूहूर्तावर नवीन चित्रपट (Salman Khan)

सलमान खानचा नवीन चित्रपट पुढच्या वर्षीच्या ईदच्या मूहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानने सोशल मीडियावर नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘सिकंदर’असे सलमानच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. ए.आर.मुरगदास या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाबद्दल इतर कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही.

अवश्य वाचा : गिल सेनेने मैदान मारले;राशीद खान ठरला गेमचेंजर  

साजिद नाडियाडवाला करणार सिकंदर ची निर्मिती (Salman Khan)

सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.’या वर्षी ईदला बडे मियाँ, छोटे मियाँ चित्रपट बघा आणि पुढच्या ईदला सिकंदरला भेटायला या. तुम्हाला सर्वांना ईद मुबारक’. असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे. ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनरखाली तयार होणार आहे. सलमान खानचा हा नवीन चित्रपट चाहत्यांसाठी मोठं गिफ्ट असल्याचे म्हणायला हरकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here