Salman Khan : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ नावाने येणार

Salman Khan : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ नावाने येणार

0

Salman Khan : सलमान खान (Salman Khan) यांच्या सलमान खान फिल्म निर्मित बहुचर्चित ‘बैटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) या चित्रपटाचे अधिकृतपणे नवे नाव जाहीर करण्यात आले आहे. आता हा चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ (Maatrubhumi May War Rest In Peace) या नावाने प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा एक दमदार नवीन पोस्टरही शेअर केला आहे, ज्यातून केवळ नावातील बदलच नाही तर आजच्या जगासाठी अत्यंत महत्त्वाचा संदेशही देण्यात आला आहे.

नक्की वाचा : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

खास गोष्ट म्हणजे टॅगलाइन – “मे वॉर रेस्ट इन पीस”

या नव्या शीर्षकातील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची टॅगलाइन — “मे वॉर रेस्ट इन पीस”. या विचारातून सलमान खान यांनी एक मोठा आणि अर्थपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश फक्त युद्ध किंवा संघर्षापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जगात शांततेची आशा व्यक्त करणारा आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

गलवान वॅली मधील ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित (Salman Khan)

हा चित्रपट गलवान वॅली मधील ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित असला तरी, त्याच्या नावामागील संदेश रणभूमीच्या सीमांपलीकडे जाऊन मानवतेसाठी शांततेचा विचार मांडतो.

‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान एक प्रभावी विचार प्रेक्षकांसमोर मांडत आहेत, जो लोकांच्या मनाला भिडत आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, चित्रपटाच्या नावामागील ताकदवान भावना आणि या धाडसी निर्णयाचे अनेक जण कौतुक करत आहेत.