Sambhaji Bhide:’छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते,त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला’-संभाजी भिडे

0
Sambhaji Bhide:'छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते,त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला'-संभाजी भिडे
Sambhaji Bhide:'छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते,त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला'-संभाजी भिडे

Sambhaji Bhide : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला.आपल्याकडचे प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत,असे मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी व्यक्त केले. छत्रपती शहाजी राजे हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे,या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष,गट,संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत,अशी टीका संभाजी भिडे यांनी केली. ते बुधवारी (ता.२६) सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

नक्की वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष!

‘हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले’ (Sambhaji Bhide)

हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले,असे संभाजी भिडे यांनी म्हटले.सध्या छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून बलिदान मास पाळण्यात येत आहे. शनिवारी (ता. २९) सांगलीत शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी साडेसात वाजता मूक पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अवश्य वाचा : निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी;’बंजारा’चा टीझर प्रदर्शित  

‘रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक’ (Sambhaji Bhide)

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरुन सध्या वाद सुरु आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजे जे बोलत आहेत, ते १०० टक्के चूक आहे. वाघ्याची जी कथा सांगितली जाते,ती सत्य आहे. आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्या काळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. त्याचे प्रतीक म्हणून वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर राहिला पाहिजे.स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही,असे संभाजी भिडे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here