Sambhaji Bhide:’रायगडावरचा ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करावा’- संभाजी भिडे  

0
Sambhaji Bhide:'रायगडावरचा ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करावा'- संभाजी भिडे  
Sambhaji Bhide:'रायगडावरचा ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करावा'- संभाजी भिडे  

Sambhaji Bhide : रायगडावरील ६ जूनचा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे,या सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी म्हटलं आहे. भिडे यांनी कोल्हापुरात (kolhapur) बोलताना शिवराज्याभिषेकावर भाष्य केले आहे.

नक्की वाचा : अखेर वैष्णवी हगवणेच्या दीर व सासऱ्याला अटक;७ दिवसांपासून कुठे होते ?   

‘तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडावेत’ (Sambhaji Bhide)

संभाजी भिडे म्हणाले की, तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत.त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरूनही भाष्य केलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको,असे विधान भिडे यांनी केले. या कुत्र्याचं राजकारण करू नये, असं त्यांनी सांगितले. इतिहास संशोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भिडे यांनी वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत ? अशी विचारणा केली. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अवश्य वाचा : अखेर मृत वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द   

‘हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे’ – भिडे (Sambhaji Bhide)

पुण्यात हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीच्या प्रकरणावर भाष्य करताना संभाजी भिडे म्हणाले की, हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे.