Sampada Patsanstha : ‘संपदा पतसंस्था’ अपहार प्रकरणी वाफारेसह २२ जण दोषी

Sampada Patsanstha : 'संपदा पतसंस्था' अपहार प्रकरणी वाफारेसह २२ जण दोषी

0
Sampada Patsanstha
Sampada Patsanstha

Sampada Patsanstha : नगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (Sampada Patsanstha) अपहार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे सह २२ जणांना दोषी धरले आहे. या प्रकरणात १३ कोटी ३८ लाख ५५ हजार ६६७ रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका आरोपींवर (Accused) आहे. न्यायालयात या आरोपींना शिक्षा देण्यासाठीची सुनावणी सोमवारी (ता. ८) होणार आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा: मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

काही आरोपींचे निधन (Sampada Patsanstha)

या प्रकरणात वाफारेसह सुजाता वाफारे, सुधाकर थोरात, भाऊसाहेब झावरे, उत्तमराव चेमटे, दिनकर ठुबे, विष्णूपंत व्यवहारे, राजे अमीर, बबन झावरे, लहू घंगाळे, हरिषचंद्र लोंढे, रवींद्र शिंदे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, अनुप पारेख, मारुती रोहकले, चिमाजी रोहकले, बबन रोहकले, सुधाकर सुंबे, गोपीनाथ सुंबे, महेश झावरे, संगीता लोंढे हे २२ आरोपी आहेत. यातील काही आरोपींचे निधन झाले आहे. 

नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश

बेकायदेशीररित्या कर्ज वाटप (Sampada Patsanstha)

या अपहार प्रकरणी १ ऑगस्ट २०११ रोजी लेखा परीक्षक देवराम बारसकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक, अपहार आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले होते. फिर्यादीमध्ये विनातारण कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच तत्कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व कर्मचारी यांनाही बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करण्यात आले होते. आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी ही रक्कम वापरली होती. तसेच रकमेच्या खोट्या नोंदी करून सभासदांना चुकीची माहिती दिली होती. हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here