Sampat Baraskar : कचरा डेपो हटवल्याने विकासाला गती : संपत बारस्कर

Sampat Baraskar : कचरा डेपो हटवल्याने विकासाला गती : संपत बारस्कर

0
Sampat Baraskar : कचरा डेपो हटवल्याने विकासाला गती : संपत बारस्कर
Sampat Baraskar : कचरा डेपो हटवल्याने विकासाला गती : संपत बारस्कर

Sampat Baraskar : नगर : सावेडीतील कचरा डेपो (Savedi Garbage Depot) मुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधी, रोगराई व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात नागरिकांच्या मागणीनुसार वारंवार निवेदने व आंदोलने करून आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या सहकार्याने कचरा डेपो हटवण्यात यश आले. त्यामुळे या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. सावेडी उपनगर हे वेगाने विकसित होणारा भाग आहे. यासाठी नियोजनबद्ध विकासकामे हाती घेण्यात आली असल्याचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर (Sampat Baraskar) यांनी सांगितले.

नक्की वाचा :  जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?  

ड्रेनेज लाईन, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

माजी महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून तपोवन रोड, लक्ष्मीनगर येथील ड्रेनेज लाईन, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, गणेश बोरुडे, गणेश मरकड, वैभव अहिरे, संजय पादिर, प्रदीप कार्ले, प्रदीप बोराडे, दीपक गायकवाड, अनिल शिंदे, संदीप इंगळे, दत्ता कदम, विठ्ठल गांगर्डे, अंबादास जिंदम, शरद जाधव, अंकुश सांगळे, विजय वाळके, ड. सुधीर टोकेकर, रमेश पानसंबळ, विशाल भुते, नरेश सब्बन, कल्याण बाबर, अमोल भांड आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

कामांमुळे प्रभागात विकासाचा वेग वाढला (Sampat Baraskar)

सावेडी उपनगरात विशेषतः पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणे, डी. पी. रस्ते, कॉलनी अंतर्गत रस्ते व कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण करणे, अशा कामांमुळे प्रभागात विकासाचा वेग वाढला असल्याचे त्यांनी म्हटले.

या वेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, प्रभागातील नागरिकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत आम्ही विकासाची कामे मार्गी लावत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी पर्यावरण संतुलनासाठी लोकचळवळ उभी करून वृक्षारोपण व संवर्धनाला प्रोत्साहन दिले आहे. आज प्रभाग क्रमांक १ हा विकसित भाग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. “जी कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित होती ती त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळे परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे,” असे नागरिकांनी सांगितले.