
Sampat Barskar : नगर : महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त हे शहराचे प्रथम नागरिक असून त्यांच्या कार्यालयामध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून आयुक्त यांना अरेरावी करत धिंगाणा घालण्याचे काम केले आहे. ही घटना निषेधार्थ असून भविष्यात कोणी, अशा प्रकारचे वर्तन केल्यास त्याला हिंदुत्ववादी संघटना धडा शिकवण्याचे काम केले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर (Sampat Barskar) यांनी व्यक्त केली.
अवश्य वाचा: अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे
अनधिकृत कत्तलखाने पाडल्याबद्दल सत्कार
अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी अरेरावी व धिंगाणा घातल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेत आयुक्तांची भेट घेऊन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून अनधिकृत कत्तलखाने पाडल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, दीपक खेडकर, भाऊ बारस्कर, गणेश बोरुडे, सतीश ढवण आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबरला नगर येथे बैठक
माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, (Sampat Barskar)
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, अशा पद्धतीने हातवारे करणे धिंगाणा घालणे हे चुकीचे आहे. तरी सर्वांनी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.