Samruddhi Mhamarg : नगर : महाराष्ट्राची (Maharashtra) भाग्यरेषा म्हणून ज्या समृद्धी महामार्गाची ओळख आहे, तोच मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरत चाललाय. धक्कादायक म्हणजे ‘समृद्धी’ महामार्ग (Samruddhi Mhamarg) खुला झाल्यानंतर ११ डिसेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनेक गंभीर अपघात (Accident) घडले. महामार्गावर गेल्या ११ महिन्यांत एकूण १,०४० अपघातांची नोंद झाली.
हे देखील वाचा: ..ती राजकीय चूक झाली, नाहीतर राज्यात भाजपची सत्ता आली नसती; माजी मुख्यमंत्र्यांची कबुली
समृद्धी महामार्गावर ६४ प्राणांतिक अपघात, १३० गंभीर जखमी होणारे, ३२९ किरकोळ जखमी होणारे, तर ५१७ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची नोंद महामार्ग पोलिसांच्या अहवालात झाली आहे. यात सर्वाधिक अतिवेगामुळे झालेल्या अपघातांमध्ये एकूण १३२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
नक्की वाचा: वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित
समृद्धी महामार्गावर नागपूर विभागात सर्वाधिक अपघातांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये खुर्सापूरमध्ये ५५ अपघात, जाम येथे ११७ अपघातात १५ मृत्यू, धामणगाव रेल्वे येथे १३१ अपघातात ९ मृत्यू, आमनी २१६ अपघातांत १० मृत्यू, मलकापूरमध्ये १३७ अपघातांमध्ये सर्वाधिक ४६ मृत्यू झाले आहेत. महामार्गावर नागपूर विभागात ६५६ अपघातांमध्ये ८० मृत्यूची नोंद झाली आहे, तर छत्रपती संभाजीनगर २१५ अपघातात २४ मृत्यू, जालना ११७ अपघात १२ मृत्यू, बाभळेश्र्वर २२ अपघात, ९ मृत्यू, घोटी ४ अपघात, सिन्नर २५ अपघात ७ मृत्यू, असे एकूण १०४० अपघातांमध्ये २१२ मृत्यूची नोंद झाल्याची माहिती महामार्ग पोलीस विभागाने दिली आहे.