Sandesh Karle : नगर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले (Sandesh Karle) यांच्यावर राजकीय पार्श्वभूमीतून ॲट्रासिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यांची उपस्थिती
यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, रामदास भोर, माजी जिल्हा परिषद् सदस्य बाळासाहेब हराळ, शाम नळकांडे, सुरेश तिवारी, दत्तात्रय कावरे, कैलास शिंदे, ओंकार सातपुते, प्रभाकर घोडके, अशोक झरेकर, सोमनाथ झरेकर आदी उपस्थित होते.
गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याची मागणी (Sandesh Karle)
अहिल्यानगर नगर तालुक्यातील घोसपुरी येथे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये ते जखमी होऊन ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची विचारपूस करण्यासाठी संदेश कार्ले हे गेले होते. त्याचा त्याचा राग मनात धरुन संदेश कार्ले यांच्यावर ॲट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी करुन दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.