Sandhan Valley Closed:सांदण दरी परिसरात पर्यटकांना नो एन्ट्री,वन विभागाचा मोठा निर्णय

पावसाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वनविभागाकडून (Forest Department) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्रसिद्ध सांदण दरी (Sandhan Valley) पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच पुढील चार महिने पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

0
Sandhan Valley Closed: सांदण दरी परिसरात पर्यटकांना नो एन्ट्री,वन विभागाचा मोठा निर्णय
Sandhan Valley Closed: सांदण दरी परिसरात पर्यटकांना नो एन्ट्री,वन विभागाचा मोठा निर्णय

नगर : राज्यात मान्सूनची दमदार एन्ट्री झाली आहे. त्यामुळे विविध भागात जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर तोबा गर्दी होत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वनविभागाकडून (Forest Department) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्रसिद्ध सांदण दरी (Sandhan Valley) पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच पुढील चार महिने पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू

सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित (Sandhan Valley Closed)

गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. सांदण दरी पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटकयेथे पावसाळी सहलीसाठी दाखल होतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील सर्वात मोठ्या सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू   

आशिया खंडात ‘सांदण दरी’चा दुसरा क्रमांक (Sandhan Valley Closed)

आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांदण दरी’चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ ४ किमी लांबवर पसरलेली आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे ही सांदण दरी आहे. प्रत्येक वर्षी देशभरातील हजारो पर्यटक या दरीला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वन विभागाने चार महिने सांदण दरी येथे प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here