Sandhya Shantaram:’पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

0
Sandhya Shantaram:'पिंजरा' फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
Sandhya Shantaram:'पिंजरा' फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

नगर : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा ‘पिंजरा’मध्ये (Pinjara Movie) काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचे निधन (Passes Away) झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा:एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटेंच्या भावावर हल्ला  

मुलाने दिली निधनाची माहिती (Sandhya Shantaram)


ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. शनिवारी (ता.४) सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टुडिओ मधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल (ता.३) संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले,असे किरण शांताराम यांनी सांगितले.

अवश्य वाचा:  महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार;’या’ तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार   

संध्या शांताराम यांची कारकीर्द  (Sandhya Shantaram)

संध्या शांताराम यांचं खार नाव विजया देशमुख होतं. त्या दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या मावशी होत्या. रंजना यांनी अभिनयाचे धडे मावशीकडूनच गिरवले होते. मराठी चित्रपटसृष्टीमधील आयकॉनिक सिनेमा म्हणून ‘पिंजरा’ ओळखला जातो. या सिनेमातील बहारदार नृत्याने अभिनेत्री संध्या शांताराम यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या चित्रपटातील संध्या यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली. आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते.