Sangamner : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकासमोरच होणार 

Sangamner : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकासमोरच होणार 

0
Sangamner : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकासमोरच होणार 
Sangamner : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकासमोरच होणार 

Sangamner : संगमनेर: काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर (Sangamner) तालुका व शहर हे विकासाचे मॉडेल ठरले असून या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली असल्याची माहिती विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

अवश्य वाचा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

आमदार तांबे म्हणाले की

 या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीबाबत अधिक माहिती देताना आमदार तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेर मधील बस स्थानकासमोर व्हावा, ही संगमनेरकरांची मागणी होती. यानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने एसटी महामंडळाकडे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा मिळावी, याकरता प्रस्ताव देवून मागणी केली होती. याकरता नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी मोठा पाठपुरावाही केला. 2019 नंतर सातत्याने आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज या जागा मागणीच्या प्रस्तावास व अश्वारूढ पुतळ्यासाठी अंतिम मंजुरी दिली आहे.

Sangamner : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकासमोरच होणार 
Sangamner : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकासमोरच होणार 

नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

मोठे शहीद स्मारक होणार (Sangamner)

त्यामुळे आता लवकरच संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोरच सुशोभीकरणासह भव्य असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार आहे. त्याचबरोबर सध्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर मोठे शहीद स्मारक होणार असून या ठिकाणी 100 फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचे नियोजित असल्याचेही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्या असलेल्या पुतळ्याजवळ अद्ययावत सुशोभीकरणासह भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारला जाणार असल्याचेही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here